HOMEMADE HEALTHY NUTRITIONAL PROTEIN POWDER
साहित्य -
1 कप गहु, 50 gm बदाम, 50 gm शेंगदाने, आवडीनुसार सुकामेवा ( ड्रायफ्रूट्स ) घेऊ शकता, दुध पावडर, कोको पावडर, अर्धा चमचा विलायची पावडर, 25 gm भोपळ्याच्या बिया ( pumpkin seeds )
कृती
1 कप गहू स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी सूती कपड्यात बांधून ठेवा, 2 दिवस मोड येऊ द्या अधुन मधून बांधून ठेवलेल्या कपड्यावर पाणि शिंपडा ( गहु कोरडे पडू देवू नका मोड नीट येणार नाही ) मोड आलेले गहू मंद आचेवर कढईत भाजून घ्या आच मंद असावी़ कुरकुरीत होईपर्यंत भाजुन घ्या.
50gm बदाम भाजून घ्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या. आवड़ीनुसार घेतलेले ड्रायफ्रूट्स भाजून घ्या प्रथम गहु ठंड झाल्यावर मिक्सरमधे वाटुन घ्या नंतर शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्स वाटून घ्या. (हे सगळे जिन्नस वाटून घेताना मिक्सरचे भांडे गरम होऊन शेद येणार नाही याची काळजी घ्या पावडर जास्त दिवस टिकनार नाही चीकट होईल )
वाटलेले मिश्रनामधे आवड़ीनुसार दूध पावडर आणि 3-4चमचे कोको पावडर मिक्स करा मुलांना आवडत असेल तर विलायची पावडर घाला. ( Vanilla powder वापरली तरी चालेल )
1चमचा तयार पावडर 1ग्लास कोमट दुधात मिसळून घ्यावी.
बाजारात मिळणारे प्रोटीन पावडर पेक्षा घरचे केव्हाही चांगले.


1 टिप्पण्या
Wow... Jabardast
उत्तर द्याहटवा