Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

सत्यनारायण महाप्रसादाचा शिरा

सत्यनारायण महाप्रसादाचा शिरा

साहित्य :

१ कप बारीक रवा, 
१ कप साखर,
१ कप साजूक तूप,
२ कप दूध,
१/२ कप पाणी, 
१/४ टिस्पून इलायची पावडर, 
आवडीचे ड्रायफ्रुटस, 
केसर, 
१ केळं.


कृती:

सर्व प्रथम एक कढई किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामध्ये तूप घालावे. तूप वितळले कि त्यात रवा घालावा व खमंग छान १५-२० मिनिट मध्यम आंचेवर भाजून घ्यावा. रवा भाजे पर्यंत दूध आणि पाणी मिक्स करून गरम करून घ्यावे. रव्याचा छान सुवास येवू लागला, की त्यामधे प्रथम केळं टाकावे  नंतर  त्यात दूध घालावे. चांगले एकत्र करून घ्यावे. आता ह्या मध्ये साखर, वेलची पूड, केसर आणि आवडी प्रमाणे सुका मेवा घालावा. सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. आणि ४-५ मिनिटे मध्यम आंचेवर वाफ काढून घ्यावी. नैवेद्या साठी शिरा तयार.

Amazon Best Deal of the Day.


टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या