सत्यनारायण महाप्रसादाचा शिरा
१ कप बारीक रवा,
१ कप साखर,
१ कप साजूक तूप,
२ कप दूध,
१/२ कप पाणी,
१/४ टिस्पून इलायची पावडर,
आवडीचे ड्रायफ्रुटस,
केसर,
१ केळं.
सर्व प्रथम एक कढई किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यामध्ये तूप घालावे. तूप वितळले कि त्यात रवा घालावा व खमंग छान १५-२० मिनिट मध्यम आंचेवर भाजून घ्यावा. रवा भाजे पर्यंत दूध आणि पाणी मिक्स करून गरम करून घ्यावे. रव्याचा छान सुवास येवू लागला, की त्यामधे प्रथम केळं टाकावे नंतर त्यात दूध घालावे. चांगले एकत्र करून घ्यावे. आता ह्या मध्ये साखर, वेलची पूड, केसर आणि आवडी प्रमाणे सुका मेवा घालावा. सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. आणि ४-५ मिनिटे मध्यम आंचेवर वाफ काढून घ्यावी. नैवेद्या साठी शिरा तयार.



4 टिप्पण्या
Mahaprasadacha sheera sopya padhatine kasa banawawa yachi👌 mahiti Ritu madam.
उत्तर द्याहटवाChaan ani sopya bhashet sangitle ahe
उत्तर द्याहटवाdhanyavad....
Khup mast....amhi nakki banau
उत्तर द्याहटवा. thanks for this
Khup chan aani Sophi receipe aahe ,aashach receipe pathavat ja
उत्तर द्याहटवा