Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

HOMEMADE HEALTHY PEANUT CURD

शेंगदाण्यापासून बनवलेले पौष्टिक दही 
HOMEMADE HEALTHY PEANUT CURD  


शेंगदाने खाण्याचे फायदे

शेंगदाण्याला गरिबाचा काजू मानले जाते. शेंगदाण्यामधे काजू सारखे काही गुण असतात, म्हणून शेंगदाने प्रोटीन्स साठी सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत मानले जाते.  
मराठीत एक म्हण आहे " कोणतीही गोष्ट प्रमाणात केली तर ती लाभदायक ठरते, आणि जर अमृत प्रमाणा पेक्षा जास्त घेतले तर ते ही विषारी ठरते. " 
शेंगदाने पचायला थोडे जड असतात, त्यामुळे ते भिजवून खा, नाहीतर गूळ शेंगदाने खा. जे व्यक्ती प्रमाणात शेंगदाने खावून रोज व्यायाम करतात त्यांच्या शरीरास जास्त लाभदायक ठरतात. रक्त वाढण्यास मदत होते वजन वाढते.  शेंगदाण्यामधे कॅल्षियम आणि  जीवनसत्व  डी  जास्त प्रमाणात असते यामुळे हाडे मजबूत होतात.  

साहित्य

७ मि. लि. पाणी, १ कप शेंगदाने, हिरव्या मिरचीचे ८ ते ९ देठ. 

कृती
  
1 कप शेंगदाने धुवून ४ तास भिजत ठेवावे. (शेंगदाने कच्चे असायला हवे, ४ तासापेक्षा जास्त भिजवले तर दही चांगले लागत नाही ) भिजवलेले शेंगदाने मिक्सरमधे वाटून घ्या. वाटताना थोडे थोडे पाणी टाकून वाटुन घ्या. ( ७ मि.लि. पाणी लागेल ) वाटलेले मिश्रण सुती कपड्याने गाळून घ्या, कपड्यामधे राहिलेला चोथा घट्ट पिळुन घ्या. वाटलेले मिश्रण एका मोठ्या भांड्यामधे घेऊन गॅसवर ५-१० मिनिटे मंद आचेवर उकळून घ्या. मिश्रण थोडे कोमट असेल तेव्हाच मातीच्या नाहीतर काचेच्या भांड्यात काढून वरुन हिरव्या मिरचीचे ८ ते १० देठ काढून टाकावे. ( मिरचीचे देठ आधीच काढून ठेवू नका, सुरवातीला फक्त मिरचीचे देठ वापरावे लागते नंतर दही लावण्यासाठी आधीच्या दहीमधले ४ते५ चमचे दही वापरा ), मिरचीच्या देठामधे असे काही जीवाणु असतात कि, त्यामुळे दही तयार (ferment) होते. हे मिश्रण उबदार ठिकाणी ठेवा (ओव्हन असेल तर त्यामधे ठेवा ), ८ ते ९ तासानंतर बघा तुम्ही बनवलेले घरगुती शेंगदाण्याचे पौष्टिक दही खाण्यासाठी तयार असेल. 




फायदे 

१) डेअरिच्या दहीपेक्षा शुद्ध आणि पौष्टिक दही आहे.  
२) कमी खर्च करुण पौष्टिक दही खायला मिळते.  
३) हे दही खुप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो, अनेक पदार्थ बनवता येतात.   

Amazon Best Deals of the Day

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या