रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी गुणकारी काढा
BEST DRINK FOR BOOSTING IMMUNITY
२ ग्लास पानी, १ इंच किसलेले आले, ४ विलायची, १ तमालपत्र, २ दालचिनी, १० - १२ तुळशीची पाने, आवडीनुसार गुळ, ४ - ५ गुळवेल, २ कळीमिरी, २ लवंग.
कृती
एक भांडे घ्या त्यामधे २ ग्लास पाणी घाला गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. विलायची, दालचिनी,कळीमिरी,लवंग कुटुन घाला गुळवेल सोलून त्याचे बारीक़ तुकड़े करुण घाला नंतर आले,तमालपत्र, तुळशीची पाने घाला २ ग्लास पाणी उकळून १ ग्लास झाले की गूळ घालुन एक उकळी आणून गॅस बंद करा, मिश्रण गाळून घ्या आता काढा पिण्यास तयार आहे.
टिप.
१ काढा तयार करताना गरम मसाले वापरले जातात त्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणुन काढयाचे अति सेवन करू नये.
२ एक ग्लास गरम काढ़ा त्यामधे अर्धा चमचा तूप टाकून पिण्यास घ्या असे केल्याने गरम मसाल्यांमुळे होणारा त्रास कमी होतो.
३ तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर तुम्ही काढा करताना त्यामधे १ चमचा बड़ीसोप, अर्धा चमचा धने,अर्धा चमचा जीरे यांची पावडर करुण घाला.


1 टिप्पण्या
Kadha he saddhya shtitit khup mahatvache pey tharat ahe n tumhi dileli mahiti nehmich faydeshir tharel vishesh mhanje tyamadhe tips dilya ahet tya nakkich faydeshir thartil
उत्तर द्याहटवाDhanyavad changli mahiti share kelya baddal