Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे (BENEFITS OF BEAN SPROUTS )


 मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे 


गुणधर्म 

योग्य आहार असेल तर आरोग्यही उत्तम राहते. आहार हा चौकस असला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली तेच व्यक्ती कोरोनाशी अधिक सक्षमपणे लढू शकतात ( FIGHT TO CORONA ), हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे, त्यामुळे आहारात मोड आलेली कडधान्ये अगदी महत्वाची.

कडधान्याला मोड आणण्याच्या प्रक्रियेमुळे त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. म्हणून कडधान्य मोड आणून खाने जास्त फायदेशीर असते. मोड आलेल्या कडधान्यामधे अ,ब,क,ड जीवनसत्व असतात, त्यासोबत फायबर, लोह, खनिजे, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. शाकाहारी आहारामधे प्रोटीन्सची पूर्तता मोड आलेल्या कडधान्यातूनच होते.  

काही कडधान्य पचायला हलकी असतात उदा. मटकी, मुग, चवळी तर  काही कडधान्य पचायला कठीण असतात उदा. उडिद, कडु वाल, पावटा, वटाणा, हरभरा. ज्या व्यक्तींची पचनक्रिया कमजोर आहे त्यांनी कडधान्य रोज खाऊ नये, आठवड्यातून २-३ वेळा खाल्ले तरी चालेल.   

फायदे 

1) रक्तवाढीसाठी आहारात मोड आलेल्या  कडधान्याचा समावेश गरजेचा आहे. 

2) केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेसाठी  मोड आलेली कडधान्य अधिक फायदेशीर. 

3) मोड आलेले कडधान्य वजन कमी करुण वजन नियंत्रणात ठेवतात. 

4) मधुमेह असलेल्या  व्यक्तींनी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. 

5) मोड आलेल्या कडधान्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी राहते.

6) मोड आलेल्या कडधान्यामधे ओमेगा 3, फॅटी ऍसिडचे एक चांगले स्त्रोत आहेत जे आपल्या शरीरातिल  कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारन्यास मदत होते. 

7) मोड आलेले कडधान्य खाल्याने शरीरातील स्नायु आणि हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

8) मोड आलेले कडधान्य लहान मुलांना दिल्याने त्यांचे शाररिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते . 

मोड आलेली कडधान्य खाण्याची योग्य वेळ सकाळची.

 सकाळच्या नाश्तामधे आपण  उसळ, मिसळ, आमटी, मुगाची डाळ, मिक्स कडधान्याची भाजी, सॅलड, सॅन्डविच, कटलेट, मुगाचा डोसा, पुलाव,मटकी भेळ, चना चाट असे अनेक पदार्थ बनवुन खाऊ शकत्तो. मोड आलेले कडधान्य रात्रीचे खाने टाळले पाहिजे, खाण्यात आले तरी प्रमाण कमी ठेवा, अतिप्रमाणात खाल्ले तर काही व्यक्तींना अपचन, पोटात गॅस असे त्रास होऊ शकतात. ज्या व्यक्ती नियमित व्यायाम करुण योग्य प्रमाणात कडधान्य खातात त्यांना जास्त लाभ होतो.   

अशा मोड आलेल्या कडधान्याचा आहारात समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली.  

कडधान्याला मोड कसे आणावे

  कडधान्याला मोड आणण्याची सोप्पी पद्धत आपण पाहुया. प्रथम कडधान्य स्वच्छ धुवून घ्यावी, नंतर मोठ्या भांडयात घेवून पाणी घालून भिजवून ठेवावी. पाणी भरपूर घालावे कडधान्याच्या २-३ इंच वर असले पाहिजे, ६-८ तास भिजत ठेवावी. नंतर त्यामधले सगळे पाणी काढून २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी, सगळे पाणी निथळून घ्यावे कडधान्य चाळणीत घालून पसरून ठेवावे, चाळणीच्या खाली एक पसरट भांडे ठेवावे आणि चाळणीवर सूती कापड ओले करुण झाकण ठेवावे थाळी ठेवली तरी चालते. तुमच्याकडे चाळण नसेल तर सूती कापडामधे बांधून ठेवावे  ८-९ तास लागतील मोड येण्यासाठी.  

  कडधान्य दुपारी भीजत घालावे रात्री पाणी काढून मोड आणण्यासाठी रात्रभर ठेवावे. सकाळी वापरण्यासाठी तयार असतील आपले मोड आणलेले कडधान्य. थंडीच्या दिवसात कडधान्य भिजायला आणि मोड आणायला थोडा जास्त वेळ लागतो, थंडीमधे नेहमी पेक्षा २-३ तास जास्त ठेवावे. मोड आणलेले कडधान्य वापरुन राहिले असतील तर फ्रीज मधे ठेवावे कडधान्य जास्त वेळ बाहेर ठेवले तर चिकट होऊन उग्र वास येतो आणि कडु लागतात शक्यतो फ्रेश वापरा.  

मोड आलेल्या कडधान्याचे पौष्टिक सॅलड 

साहित्य 

 १ वाटि मोड आलेले कडधान्य ( तुमच्या आवाड़ीनुसार कडधान्य घेतले तरी चालले ), १ कांदा, १ टोमॅटो, १ गाजर, १ काकडी, थोडे कैरीचे तुकड़े, कोथंबीर, अर्धा चमचा किसलेले आले, अर्धा चमचा जीरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळे मीठ, पाव चमचा काळीमिरी पावडर, १ चमचा लिंबाचा रस, गरजेनुसार मीठ.  

कृती 

प्रथम मोड आलेले कडधान्य थोडे शिजवून घ्यावी. नंतर एका मोठ्या भांड्यात शिजवलेले कडधान्य काढा, त्यामधे कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर  बारीक चिरून घाला कोथंबीर, किसलेले आले,चाट मसाला, जीरे पावडर, काळे मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.  

खाण्यासाठी  तयार आहे आपले मोड आलेल्या कडधान्याचे पौष्टिक सॅलड.    

मोड आलेल्या मिक्स कडधान्याची भाजी 

साहित्य 

मोड आलेले कडधान्य २ वाटि ( आवड़ीनुसार कडधान्य घेतली तरी चालेल हिरवे  मुग, मटकी, चवळी, हरभरा यांचा वापर जास्त करा ),२ कांदे, १ टोमॅटो, आर्धि वाटि भाजलेले सुके खोबरे, १ चमचा तीळ, १ चमचा खसखस, १ चमचा धने, २ चमचे आले लसुन पेस्ट, कोथंबीर,२ हिरव्या मिरच्या,९ -१० कडीपत्त्याची पाने, छोटा चमचा मोहरी, जीरे, पाव चमचा हींग, अर्धा चमचा हळद, २ चमचे कांदालसून मसाला, १ चमचा गरम मसाला, ५ -६ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. 

कृती 

प्रथम मोड आलेले कडधान्य पाणि आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. नंतर मिरची, कोथंबीर, खोबरे, तिळ, खसखस, धने मिक्सरला बारीक वाटून घ्यावी, नंतर कांदे, टोमॅटो बारीक चिरून घ्या. गॅसवर कढई ठेवा ६ चमचे तेल घालावे, तेल गरम झाले की प्रथम मोहरी घाला मोहरी चांगली तडतडली की जीरे, कड़ीपत्ता,हिंग,आलेलसून पेस्ट घाला, थोडे परतून घ्यावे, नंतर कांदा टोमॅटो घाला, गरम मसाला, हळद, कांदालसून मसाला घालून परतून घ्यावे, नंतर त्यात वाटलेला मसाला घाला मसाल्याला तेल सूटे पर्यंत चांगले परतून घ्यावे. नंतर शिजवलेले कडधान्य घाला आणि एकजीव करुण घ्या. तुम्हाला भाजी किती पातळ हवी तेव्हढे पानी घाला गरजेनुसार मीठ घाला, कढईवर झाकण ठेवून ५ मिनिटे उकळी काढा गॅस बंद करुण वरुण कोथंबीर घाला.  

तयार आहे आपली मोड आलेल्या मिक्स कडधान्याची भाजी, चपाती किंवा भाकरी सोबत खा. 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या