Header Ads Widget

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

मुग डाळीची पौष्टिक भजी ( Moong dal pakoda )

मुग डाळीची पौष्टिक भजी 



मुगडाळ खाण्याचे फायदे 

मुग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मुग डाळीचे सेवन करने फायदेशीर ठरते. मुग डाळ भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यास मदत करते. मुग डाळ खाल्ल्याने रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहतो, त्यामुळे रक्तातील मॅग्नेशियमचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. 
          मुगडाळीमधे जीवनसत्व, कॉपर आणि  फोस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचेसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी  मुग डाळ फायदेशीर ठरते. पॉलीश केलेली डाळ वापरु नका, हिरव्या सालीची मुग डाळ वापरा, या डाळीमधे  अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्तिही वाढते, म्हणून मुग डाळीचे रोजच्या आहारात सेवन करणे लहान मुलांसाठी खुप फायदेशीर ठरते.  
         मुग डाळीचा खिचडी भात, मुग डाळीचे वरण, मुग डाळ सुप, मुग डाळीचे डोसे, मुग डाळीचे लाडू,  मुग डाळीचा गोड शिरा, मुग डाळीचा ढोकळा असे अनेक पदार्थ तुम्ही करुण बघा चविलाही छान लागतात आणि पौष्टिक पदार्थ  खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहते. 

 मुग डाळीची पौष्टिक भजी  ( MOONG DAL PAKODA )

साहित्य 
 
२ वाटि मुगाची डाळ, ४ चमचे तांदूळ, २ चमचे क्रश केलेले आलेलसून, १ चमचा जीरे, ४-५  हिरव्या मिरच्या, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा धने, १ चमचा  तीळ, ६-७ कडीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग, कोथंबीर, चवीनुसार मीठ.

कृती 

मुगाची डाळ व तांदूळ एकत्र २-३ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर डाळीमधले पाणी काढुन डाळ मिक्सरला दरदरित वाटून घ्या (डाळ जास्त बारीक वाटू नका, डाळ वाटताना पाण्याचा वापर करु नका ). मिरची, कोथंबीर आणि कड़ीपत्ता बारीक चिरुन घ्या जीरे, धने, तीळ, ओवा थोड़े बारीक करा. वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामधे क्रश केलेले आलेलसूण, कोथंबीर, मिरची, कडीपत्ता, धने, जीरे, तीळ, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घालून मिश्रण चांगले एकजीव करुण घ्या. कढईत तेल घेऊन गॅसवर ठेवा, तेल गरम झाले कि छोटे छोटे भजीचे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत  मंद आचेवर तळून घ्या.  

खाण्यासाठी तयार आहेत  मुगाच्या डाळीची पौष्टिक भजी. 


टिप 

१) डाळ वाटल्यानंतर डाळीचे मिश्रण मोठ्या वाटित घेऊन ५-१० मिनिटे चांगले फेटून घ्या, फेटल्यामुळे डाळ हलकी होते फुलते यामुळे भजी खुसखुशित होतात. ( शक्य असल्यास मिश्रण हाताने फेटा मिश्रण फेटल्यामुळे सोडा आणि ईनो वापरण्याची गरज पडत नाही ) 
२) भजीच्या मिश्रणामधे सोडा वापरल्यास भजी तळण्यासाठी तेल जास्त लागते, आणि भजी खुप तेलकट होतात. 
३) हळद, लाल तिखटाचा वापर केल्यास भजीचा रंग बदलतो, भजी काळपट दिसतात. 
४) भजीमधे आवडत असेल तर कांदा घातला तरी चालेल. कोथंबीर जास्त घाला चव छान लागते.
५) लहन मुले पालेभाजी खात नसतील तर भजीच्या मिश्रणामधे पालक, मेथी, कांद्याची पात चिरून घालावी.
६) डाळ भिजवताना तांदूळ नाही घातले तरी हरकत नाही, भजीचे मिश्रण तयार करताना त्यामधे ४-५ चमचे तांदुळाचे पीठ घातले तरी चालते.
७) हिरव्या सालीची मुगाची डाळ वापरली तर भजी अजुन पौष्टिक होतात.
८) फक्त मुगाच्या डाळीची भजी आवडली नाही तर, मुग डाळी सोबत आपण चना डाळ आणि उडीद डाळ वापरु शकतो, २ वाटि मुगाची डाळ असेल तर अर्धी वाटि चना डाळ आणि अर्धी वाटि उडीद डाळ घ्यावी. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या