खुसखुशीत कोथिंबीर वडी
कोथिंबीर पदार्थाच्या सजावटी साठी वापरतात हे आपल्याला माहिती आहे, पण कोथिंबीर गुणकारी व औषधि असल्यामुळे ती आपल्या निरोगी आरोग्यासाठी लाभदायक ठरते. हे आपल्याला माहिती होते का म्हणून आपण कोथिंबीर खाण्याचे फायदे थोडक्यात पाहुया.
कोथिंबीर खाण्याचे फायदे
- कोथिंबीर मधे जीवनसत्व भरपूर असल्यामुळे कोथिंबीरच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्वचेसाठी, डोळ्यांसाठी उपयुक्त ठरते.
- रोज सकाळी कोथिंबीर पाण्यात उकळूण ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे, असे केल्यास मुतखडा असलेल्या व्यक्तींना फायदा होतो
- २ चमचे धने, १ चमचा जीरे, १ चमचा बडिशेप थोडे कुटून घ्यावे, १ ग्लास पाण्यामधे घालावे आणि १ वाटी कोथिंबीर घालून ५ मिनिटे उकळावे, नंतर गाळून घेवून गार झाल्यावर प्यावे, लघवी साफ होण्यास मदत होते आणि पोटाच्या समस्या कमी होतात.
- २ चमचे कोथिंबीर रस २ चमचे बारीक खडीसाखर अर्धा कप पाण्यात मिसळून घ्या कमजोरी आणि चक्कर येण्याची समस्या कमी होते.
साहित्य
- कोथिंबीर १ जुडी
- बेसन १ वाटी
- तांदुळाचे पीठ १ वाटी
- ज्वारीचे पीठ २ चमचे
- हिरवी मिरची ४ -५
- लसूण पाकळ्या १५ -२०
- धने २ चमचे
- जीरे २ चमचे
- तीळ ४ -५ चमचे
- खसखस २ चमचे
- ओवा १ चमचा
- हिंग पाव चमचा
- हळद पाव चमचा
- लाल तिखट अर्ध चमचा
- लिंबू रस १ चमचा
- चवीनुसार मीठ
- तळण्यासाठी तेल.
कृती
कोथिंबीर निवडून खराब पाने काढून २ ते ३ वेळा स्वच्छ धुवुन घ्या, कोथिंबीरला जास्त माती असेल तर धुवून एका मोठ्या भांड्यात पाणी आणि कोथिंबीर घेऊन ५ मिनिट बाजूला ठेवून द्या, असे केल्यामुळे कोथिंबीरला लागलेली माती खाली राहते नंतर पाण्यावरती तरंगलेली कोथिंबीर अलगद पने काढून घ्या. कोथिंबीर स्वच्छ धुतली नाही आणि माती राहिली तर वडी खातना ती दाताखाली कचकच लागते. आता कोथिंबीर कोरडी होण्यासाठी स्वच्छ सूती कपड्यावर पसरून ठेवा. कोथिंबिरीतलं पाणी पूर्ण सुकलं की मग ती बारीक चिरून घ्या. नंतर गॅस वर तवा ठेवून धने आणि जीरे भाजून घ्या आणि दरदरित वाटून घ्या. नंतर तव्यावर हिरवी मिरची आणि लसूण थोडे तेल सोडुन परतून ठेचून घ्या थोडक्यात मिरचीचा ठेचा करुन घ्या. एक परात घेवून त्यामधे चिरलेली कोथिंबीर, मिरचिचा ठेचा, हळद, तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, तीळ, ओवा, खसखस, हिंग आणि लिंबूचा रस घालून चांगलं एकजीव करून पंधरा मिनिटं बाजुला ठेवून द्या. जरा वेळानं हे मिश्रण ओलसर होईल. आता त्यात तांदुळाचे पीठ, ज्वारीचे पिठ, बेसन पीठ आणि २-३ चमचे तेल घालून चांगले मळून घ्या. बेसन या मिश्रणात मावेल तसं थोडे थोडे घालत जा. गरज असल्यास थोडंसं पाणी घालून पीठ भिजवा. (पीठ जोर लावून मळा कोथिंबीरला पाणी सुटते यामुळे पाणी घालण्याची गरज पडत नाही) साधारणपणे भाकरीच्या पिठा सारखे भिजवा. त्याला १ टीस्पून तेलाचा हात लावून त्याचे रोल करून घ्या. रोल बारीक करा ते वाफवण्यासाठी एक चाळण घ्या, तिला तेल लावून घ्या, तेल लावल्यामुळे रोल्स चाळणीला चिकटणार नाही नंतर चाळणीमधे केकेले रोल ठेवा गॅस वर पातीले ठेवून त्यामधे ३-४ ग्लास पाणी घाला, पाण्याला उकळी आली की चाळण पातील्यावर ठेवून झाकण ठेवा. १५ मिनिटे शिजू द्या १५ मिनिटे झाल्यावर शिजले का चेक करा हात लावून बघा हाताला पीठ चिकटले नाहीतर समजायचे शिजले आहे.(सूरी घेवून ती आंत घालून बाहेर काढा सुरीला पीठ चिकटले नाहीतर समजायचे शिजले आहे) थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झाल्यावर त्याचे पातळ काप करुण घ्यावे एका कढईत किंवा तव्यामधे तेल गरम करुण मंद आचेवर वडया तळून घ्या, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. जास्त तळुन घेऊ नका चव बदलते प्लेट मधे टिश्यू पेपर घेवून वडया काढून घ्या, टिश्यू पेपरमुळे जास्तीचे तेल निघून जाईल नाहीतर पॅनमध्ये शॅलो फ्राय करा (उकडलेल्या वडया छान लागतात तेलकट कमी खातात त्यांनी तळून नाही घेतल्या उकडलेल्या खाल्या तरी चालेल).
खाण्यासाठी तयार आहे खुसखुशीत कोथिंबीर वडी.
टिप
- कोथिंबीर चांगली कोरडी करा, नाहीतर बेसनपीठ जास्त लागते वडी खुसखुशीत होत नाही.
- कोथिंबीर चिरताना जमेल तितकी बारीक चीरुन घ्या, यामुळे पीठ मळताना कोथिंबीरला पाणी सुटते पाणी जास्त लागत नाही.
- बेसन पीठाचे पदार्थ पचायला जड जातात पोट खराब होण्याची श्क्यता असते, म्हणून ओवा आणि हिंग यांचा वापर आठवणीने बेसनपीठाच्या पदार्थामधे करा.
- कोथिंबीर वडी मधे तीळ जास्त घाला चविष्ट लागते आणि वडी दिसायलाही छान दिसते.
- वडीचे मिश्रण मळताना ३-४ चमचे तेल गरम करुण मिश्रणात घातल्यामुळे उकड़ल्यानंतर छान लागते आणि वडी क्रिस्पी होते.
- मिरचीचा ठेचा करुण पिठात वापरल्यामुळे वडी खातना मिरचीचा आणि लसुनचा कचवट पणा जाणवत नाही वडी खायला खमंग लागते.
- शक्य असल्यास कोथिंबीर वडीमधे धने आणि जीरे भाजून दरदरित कुटुन घाला, टेस्ट छान लागते रेडिमेड पावडर वापरु नका.
- रोल्स चे काप करताना पातळ करावे, वडया खरपुस तळून निघतात आणि कुरकुरित होतात.
- शक्य असल्यास लोखंडी तवा घेवून त्यावर थोडे तेल सोडून वडया शॅलो फ्राय करा, लोखंडी तवा वापरल्यामुळे शरीराला लोह (iron) मिळते, तेल कमी लागते वडया खरपूस तळता येतात आणि खातना क्रिस्पी लागतात.
- वड्यांची भाजी करुण तुम्हाला खाता येईल, त्यासाठी वड्यांचे बारीक तुकडे करुण घ्या, तेला मधे पहिले मोहरी घाला ती तडतडली की, जीरे हिंग कड़ीपत्ता थोडी हळद घालून खमंग फोडणी तयार करा त्या फोडणीमधे वड्यांचे बारीक तुकडे घालून झाकण ठेवून वाफ काढा, वरुण किसलेले ओले खोबरे घाला तयार झाली कोथिंबीर वड्यांची भाजी.
खुसखुशीत कोथिंबीर वडी रेसिपी तुम्ही नक्की करुण बघा आवडली तर Like, Comments and Share करा.



1 टिप्पण्या
Kothimbir hi nehmich kontyahi padarthachi chav vadhavte pn ti jast pramanat vaparli Jat nahi n kharab hote tumhi sangitlelya recipe ne tyacha Uttam vapar karta yenar ahe n vaya hi janar nahi ashach veg veglya ani navin recipe gheun ya jya sarvancha kami yetil
उत्तर द्याहटवा