पौष्टिक गुळ शेंगदाणे लाडू
गुळ-शेंगदाणे खाण्याचे फायदे
लोहाचा (Iron) उत्तम स्रोत म्हणजे गुळ आणि प्रथिनेचा (Protein) उत्तम स्रोत म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे आणि गुळ दोघांमधे असे पोषक तत्त्वे असतात जे बऱ्याच आजारांपासून आपला बचाव करण्यास मदत करतात. अनेक आयुर्वेदिक औषधे व काढा बनवताना गुळ वापरला जातो. नुसताच गुळ किंवा फक्त शेंगदाने खाण्याचा फायदा होतोच पण गुळ शेंगदाणे एकत्र खाल्याने शरीरास अधिक फायदे मिळतात.
गुळ-शेंगदाणे लाडू मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायक आहेत. महागडी चॉकलेट, बेकरीचे पदार्थ, पॅकेट बंद पदार्थ इत्यादी खाऊन तब्येत आणि दात खराब करण्यापेक्षा, स्वस्त आणि पौष्टिक असे गुळ-शेंगदाणा लाडू, गुळ-शेंगदाणा चिक्की किंवा मुठभर शेंगदाणे आणि गुळ घेऊन खाल्लेले केव्हाही चांगले. हे लाडू रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात, म्हणून आपण लहान मुलांना किंवा आजारी असलेल्या व्यक्तींना भेटायला जाताना जर असे गुळ-शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू घेऊन गेला तर लहान मुलांसाठी आणि आजारी व्यक्तींसाठी खुप फायद्याचे ठरेल. थंडीच्या दिवसात गुळ -शेंगदाणे लाडू करताना त्यामधे भरपूर तीळ आणि तूप घालून बनवले आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी या लाडूचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी मदत होते त्यामुळे हिवाळ्यात गुळ -शेंगदाणे लाडू खाल्ले तर आपल्या शरीरास ते खुप लाभदायक ठरतात.
- गुळ-शेंगदाण्यात प्राथिने आणि कैल्शियम असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.
- गुळामधे अँटीऑक्सिडेंट्स आणि सेलेनियम सारखे पोषक द्रव्य आहेत त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते म्हणून गुळ आणि शेंगदाणे रक्त वाढीसाठी चांगले असते.
- दमा आणि श्वासनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
- गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
- गुळामधे लोह आणि शेंगदाण्या मधे प्रथिने व कैल्शियम भरपूर असल्याने, शरीराला ऊर्जा मिळते, थकवा दूर होतो आणि अशक्तपणा दूर होऊन शरीरातील ताकद वाढते.
- योग्य प्रमाणात गुळ-शेंगदाणे खाल्ले तर पचन क्षमता चांगली राहते, भूक वाढते, पोटाचे विकार कमी होतात, उदा पोटात गॅस होणे अपचन होणे.
- मासिक पाळीच्या दिवसात होणारा त्रास कमी करण्यासाठी, प्रेग्नन्सीमधे शरीरातले लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि डिलिव्हरी नंतर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खुप कमी होते ते भरुन काढण्यासाठी सर्वच वयोगटातील स्रीयांसाठी गुळ खाणे उपयुक्त ठरते.
- शेंगदाण्यामधे फॅट असल्यामुळे त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
अशा या अनेक फायदे आणि गुणधर्म असलेल्या गुळ आणि शेंगदाण्यापासून पौष्टिक लाडू कसे बनवतात ते पाहु.
साहित्य
- शेंगदाणे १ किलो
- गुळ १/२ किलो
- तूप १ वाटी
- विलायची पूड १/२ चमचा
- जायफळ पूड १/२ चमचा
- सुकामेवा (ऑप्शनल) आवडीनुसार
- चिमुटभर मीठ
कृती
- लाडू अजुन पौष्टिक करायचे असतील तर तुम्ही अजुन साहित्य घालु शकता तुमच्या आवाड़ीनुसार उदा सुकामेवा, खोबरे, तीळ, खसखस, खारीक पावडर, भाजकी चना डाळ, पोहे, मेथी दाने.
- शेंगदाणे भाजताना थोडे-थोडे घेवून मंद आचेवर खरपुस भाजा कढईत शेंगदाण्याचे प्रमाण जास्त घेतले तर सगळे शेंगदाणे नीट भाजले जात नाही गॅसची आच मोठी असेल तर शेंगदाणे वरुण भाजलेले दिसतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे लाडूची चव बिघडते आणि लाडू जास्त दिवस टिकट नाही.
- गुळ मोठा चिरुन मिक्सर मधे बारीक केला किंवा किसुन घेतला तर त्यामधे असलेले खडे आणि कचरा दिसून येत नाही म्हणून तो बारीक चिरुन घ्या.
- शेंगदाणे आणि गुळ एकत्र वाटल्याने चांगले मिक्स होतात आणि शेंगदाणे खलबत्त्ता मधे वाटल्या सारखे दिसतात फक्त शेंगदाणे वाटले तर काही शेंगदाण्याची पावडर होते.
- शेंगदाणे जास्त बारीक वाटले तर लाडू खाताना टाळ्याला चिकटतो.
- शेंगदाण्याला तेल सुटते आणि गुळ चिकट असतो त्यामुळे लाडू लवकर वळले जातात तूपाची गरज पडत नाही तूप नाही वापरले तरी चालते पण तूप घातलेले लाडू जास्त पौष्टिक आणि चविष्ट होतात.
- लाडूच्या मिश्रणामधे तूप घालताना गरम करुण घाला चांगले मिक्स होते लाडू लवकर वळतात टेस्टी होतात आणि जास्त दिवस टिकतात.



1 टिप्पण्या
👌👌👌
उत्तर द्याहटवा